भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4 हजार पदांची बंपर भरती! दहावी, बारावी शिकलेले करु शकतात अर्ज

दहावी, बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. मर्चंट नेव्हीमध्ये चार हजार पदांची बंपर भरती निघाली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Apr 6, 2024, 07:29 PM IST
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4 हजार पदांची बंपर भरती! दहावी, बारावी शिकलेले करु शकतात अर्ज title=

Indian Merchant Navy Bharti : दहावी, बारावी  पर्यंत शिकलेल्यांसाठी भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल चार हजार पदांची बंपर भरती होत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.  यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या पगार किकी असेल तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे. तसेच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख काय असेल. 

भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये विविध विभागामध्ये 4000 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना मर्चंट नेव्हीच्या अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया 11 मार्च 2024 रोजी सुरु झाली आहे. 30 एप्रिल 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

मर्चंट नेव्हीच्या अधिकृत वेबसाईवर संबधीत पदांच्या पात्रतेचे निकष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तपशीलवार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. 

भारतीय मर्चंट नेव्हीतील रिक्त पदे आणि जागा

डेक रेटिंग - 721 पदे
इंजिन रेटिंग – 236 पदे
सीमॅन – 1432 पदे
इलेक्ट्रिशियन - 408 पदे
वेल्डर/हेल्पर - 78 पदे
मेस बॉय – 922 पदे
कुक –  203 पदे

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता – दहावी/बारावी/ITI
वयोमर्यादा –  17.5 ते 27 वर्षे
भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
एकूण रिक्त पदे – 4000 पदे
अधिसूचना प्रसिद्धी तारीख – 11 मार्च 2024
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 मार्च 2024
श्रेणी – सरकारी नोकरी
शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024