तरुणीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: May 17, 2019, 05:50 PM IST
तरुणीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न  title=

बुलडाणा : खामगाव शहरातील संजीवनी कॉलनीत एका २७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी निंबोकार असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. 

धारदार शस्त्राने या तरुणीवर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार करण्यात आले. तरुणीच्या प्रियकरानेच हा हल्ला केल्याचं पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. तरुणीच्या हत्येनंतर युवकाने देखील रेल्वेतून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तो वाचला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर निंबोळे असं या तरुणाचं नाव आहे.