मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 22, 2024, 06:05 PM IST
मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक  title=
Block on Central Railway for 15 Days from Today check out time table

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमाट 10-11 ची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेकडून हे काम सुरू आहे. अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 23 मे ते 1 जूनपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात काही ट्रेन रद्द होणार आहेत. 

उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. अशावेळी गावी जाण्याकडे प्रवाशांचा ओढा असतो. अनेक प्रवाशी गावी जाण्यासाठी ट्रेनचाच पर्याय निवडतात. त्यामुळं मध्य रेल्वेवरील या ब्लॉकमुळं प्रवाशांची काहीकाळ गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषकरुन रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ शकते. 15 दिवस प्रवाशांना थोडा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आज मध्यरात्रीपासून ते 1 जूनच्या रात्रीपर्यंत ब्लॉक असणार आहे.

कोणत्या गाड्या रद्द

सीएसएमटी स्थानकाजवळ इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12.30 ते पहाटे 4.30 या दरम्यान भायखळा ते सीएसएमटी उपनगरीय गाड्या बंद असणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होणार असून बाहेरून येणाऱ्या काही गाड्या दादर स्टेशनपर्यंतच धावणार तर काही गाड्या दादरमधून सुटणार आहेत. मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस पनवलेपर्यंतच धावणार तर मुंबई-मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस पनवेलवरून सुटणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे अवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 

स्थानक - सीएसएमटी ते भायखळा

 मार्ग : अप धीमा, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका 
वेळ : रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (रोज रात्री ४ तास) ... 

२२ ते ३१ मेदरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस 

 मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम 
- सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल
- कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल 
- सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल 
- ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल 
- ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल

२८ ते ३१ मेदरम्यान या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द 

सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या रद्द असणार आहेत.

दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस 

लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत

पुणे -मुंबई गाड्यादेखील रद्द

28 मे ते 2 जूनदरम्यान मुंबई-पुणे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ही घोषणा केली आहे. प्री-नॉन इंटरलॉकिंग काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळं लांब गाड्यांना जोडण्यास मदत होणार आहे. त्यामुळं सीएसएमटीमधील ट्रेन ऑपरेशनची कार्यक्षमता सुधारणार आहे. त्यामुळं 28 मे ते 2 जूनदरम्यान मुंबई-पुणे दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना थोडाी गैरसोय सोसावी लागणार आहे.