यवतमाळ : विदर्भातील जिल्ह्यात तसेच यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय.
वर्धा इथल्या एका कार्यक्रमात येऊनही या घटनेतील पीडितांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
या मृत्यूप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय. याबाबत आपण पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिल्यानेच केंद्राचं पथक तपासणीसाठी यवतमाळमध्ये आल्याचा दावाही त्यांनी केलाय.