भाजप नगरसेवकाचा कोरोना फंडसाठी योगदान देण्यास नकार

भाजप नगरसेवकाने कोरोना सहाय्यता निधीसाठी योगदान देण्यास नकार दिला

Updated: May 9, 2020, 07:22 PM IST
भाजप नगरसेवकाचा कोरोना फंडसाठी योगदान देण्यास नकार title=

ठाणे : ठाणे महानगरपालिका (टीएमसी) च्या भाजप नगरसेवकाने कोरोना सहाय्यता निधीसाठी योगदान देण्यास नकार दिला आहे. ठाणे शहरातील नगर विकासाच्या बाबतीत पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी हा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्या आवाहनानंतर सर्व पक्षीय नगरसेवकांनी कोरोना सहाय्यता निधीसाठी ५ लाखाचे योगदान दिले. पण भाजप नगरसेवक भाजप नगरसेवक संजय वाघुळे यांना हे काही पटलेलं नाही. पालिकेच्या कोरोना सहाय्यता निधी प्रक्रियेत पारदर्शकता नाही म्हणून योगदान दिले नसल्याचे नगरसेवक वाघुले म्हणाले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १००० बेडच्या कोरोना-१९ उपचार केंद्रासाठी घेतलेल्या बैठकीत नगरसेवकांना बोलावण्यात आले नव्हते असा दावा वाघुले यांनी केलाय. 

कोरोना सहायता निधीसाठी सहकार्य करण्याच्या भुमिकेस भाजपने पाठींबा दिला पण आता मागे हटल्याचे सांगण्यात येत आहे. टीएमसीच्या १३१ नगरसेवकांमध्ये भाजपाचे २३ नगरसेवक आहेत.