Mumbai Pune Expressway Traffic Jam: ख्रिसमसची (Christmas) सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ( Traffic Jam on Mumbai-Pune Expressway) पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याला जात असाल किंवा मुंबईला येत असाल तर वेळेचं नियोजन करुनच बाहेर पडा. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो. (Traffic block on Mumbai Pune Expressway)
पुणे - मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी सुटली तरी आता मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. माणगाव बसस्थानक ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी दिसत आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. ख्रिसमसची सुट्टी तसेच विकेंडच्या सुट्टीमुळे पुण्याकडे जाण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने खालापूर टोलवर 300 मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे.
विकेंड आला की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर रविवारी ख्रिसमस सुट्टी असल्याने अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. तसेच घरी जाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने महामार्गावर जास्तीचे वाहने दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, खालापूर टोलनाक्याजवळ आणि बोरघाट येथील कांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज वीकेंड असल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या अधिक आहे. अपक्षेपेक्षा जास्त वाहनांची संख्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांचे वाहतूक कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत. वाहतुकीवर नियंत्रण आणणे कठिण झाले आहे.