अरुण म्हेत्रे , झी 24 तास, पुणे : महानगरपालिकेच्या (Pune Corporation) परिसरात मोठा राडा झाला आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. शिवसैनिकांनी भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. किरीट सोमय्या हे काही वेळापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळेस त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं समजत आहे. (shivsainik agrresive against bjp former mp and leader kirit somaiya front of pune coroporation office)
शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली आहे. किरीट सोमय्यांचा ताफा महापालिकेच्या आवारात येताच अचानकपणे शिवसैनिकांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. साधारण 80 ते 100 शिवसैनिक असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे.
शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना अडवल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
नक्की प्रकरण काय?
सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी जात होते. नेमकं याच वेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळेस हे कार्यकर्ते सोमय्या यांच्या अंगावरही धावून गेले. त्यामुळे प्रकरण आणखी वाढलं.
अनेक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या 5 वर्षांत एकाही प्रकल्पाचं नीट काम झालं नाही असे खोटे आरोप करण्यात आले. शिवसेनेवर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असाही इशारा यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना दिला आहे.
भाजप नेत्यांकडून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. तर किरीट सोमय्या यांनी याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.