Bogus Schools List in Pune: आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत जावं, चांगलं शिक्षण व्हावं असं म्हणत मुलांच्या शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीनं पालक अनेकदा चांगल्यातील चांगली शाळा निवडण्याच्या प्रयत्नांत असतात. प्रत्येक पालकाचे शाळा निवडण्याचे निकष विविध घटकांवर अवलंबून असतात. पण, पाल्यांचं हित हाच एकमेव हेतू इथं केंद्रस्थानी असतो. पण, पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची स्वप्न यांची राखरांगोळी करणाऱ्या काही शाळांची नावं नुकतीच समोर आली आहेत. शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात एक दोन नाही तर तब्बल 12 शाळा अनधिकृत असल्याचं उघडकीस आलं आहे. 'झी २४ तास'नं यापूर्वीही पुण्यातील बोगस शाळांचा मुद्दा उचलून धरला होता आणि आता पुन्हा एकदा या मुद्द्यानं पालकांना आणि प्रशासनाला खडबडून जागं केलं आहे. त्यामुळं तुमची मुलंही या अनधिकृत शाळांमध्ये नाहीत ना, हे आताच पाहून घ्या.
अनधिकृत शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. झी २४ तासच्या बोगस शाळांच्या बातमीनंतर कारवाई तर करत जिल्हा परिषदेनं काही पावलं उचलली, काही शाळा बंदही झाल्या पण काही मात्र अद्यापही सुरुच होत्या. त्यामुळं या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केलं आहे.
अनधिकृत शाळांची नावं खालीलप्रमाणे...
दरवर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर साधारण 13 जूनच्या सुमारास शाळा सुरु होतात. पण, यंदाच्या वर्षी मात्र शाळा 15 जूनला सुरु होणार असून, यापुढे शाळा या दिवशीच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळं दोन दिवसांनी का असेना, पण उन्हाळी सुट्टी वाढली याचाच विद्यार्थ्यांनाही आनंद आहे.