Zika Virus First Case in Pune Maharashtra : आता बातमी आहे पुणेकरांची चिंता वाढवणारी. पुणे (Pune) शहरात झिका व्हायरसचा (Zika Virus) रुग्ण आढळून आला आहे. 18 नोव्हेंबरला 67 वर्षांच्या एका व्यक्तीत याची लक्षणं दिसून आली. पुणे जिल्ह्यातील बावधन (Bawdhan) इथं हा रुग्ण आढळला. 16 नोव्हेंबरला हा रुग्ण पुण्यातील जहांगीर रुग्णालयात (Jehangir Hospital) ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या रक्ताचे नमुने खासजी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असात हा रुग्ण झिका बाधीत असल्याचं निश्चित झालं.
आरोग्य यंत्रणा सतर्क
ज्या व्यक्तित झिका व्हायरसची लक्षण आढळली त्याच्या घरांतील इतर सदस्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. या भागातही घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले असून त्या भागात एडीस डास उत्पत्ती आढळलेली नाही तसंच या भागात धूरफवारणीही करण्यात आली आहे. रुग्ण हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून 6 नोव्हेंबरला तो पुण्यात आला होता. त्याआधी तो 22 ऑक्टोबरमध्ये सूरत इथं गेला होता. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आलं आहे.
झिका व्हायरस म्हणजे काय?
एडिस जातीच्या डासांमुळे होणारा हौ सोम्यस्वरुपाचा आजार आहे. यात 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये तपा, अंगदुखी, डोळे येणे ही लक्षणं दिसून येतात. झिका संसर्गजन्य आजार नाही.
झिकापासून कसा कराल बचाव?
आठवड्यातून किमान एकदा पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत, पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावं. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. घराभोवती किंवा छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका.