Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. अखेर आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. कल्याणमधल्या घरातून आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे कुटुंबियांना भेटायला आला असताना त्याला अटक करण्यात आली आहे. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुतळा कोसळल्यानंतर तो फरार झाला होता.
राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (Jaideep Apte) विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस (Look out Circular) जारी केली होती. जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार करण्यात आली होती. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना झाली होती.
राजकोटच्या किल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जनतेमध्ये संतापाची लाट आहे. शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला तो जयदीप आपटे या शिल्पकाराने साकारला होता. कोणताही अनुभव नसताना जयदीप आपटेला कंत्राट देण्याचा आरोप विरोधकांनी केलाय.. 26 ऑगस्टला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता.. तेव्हापासूनच जयदीप आपटे फरार झाला होता.
शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनाही माफी मागावी लागली होती. तर पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलवर सदोष मनुष्यवध आणि सरकारची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यातील एक आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली. मात्र,जयदीप आपटे फरार होता. अखेर जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागाल आहे.
दरम्यान राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला प्रकरणी नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय. स्टेलनेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असं गडकरी म्हणाले. यावर गडकरींनी जाणकारांचा सल्ला घेऊन मत व्यक्त केलं असावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तसंच त्यांनी गडकरींच्या कामाचंही कौतुक केलं. तर नितीन गडकरींचा सल्ला सरकार मनावर घेईल, अशी अपेक्षा आमदार प्रसाद लाड यांनी बोलून दाखवली.