केबीसी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण, भाऊसाहेब चव्हाणला जामीन मंजूर

 

Updated: May 20, 2018, 01:29 PM IST

 

नाशिक : केबीसी गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी या कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाणला जामीन मंजूर झालाय. एक लाख रुपयांच्या जामीनावर भाऊसाहेब चव्हाणची जामिनावर मुक्तता करण्यात आलीय. गुंतवणूकदारांना दामदुप्पट योजनेत दोनशे कोटींची फसवणूक करुन भाऊसाहेब चव्हाण सिंगापूरला पळून गेला होता. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. या प्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब चव्हाणची ८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय.