महाबळेश्वरच्या आर्थरसिट दरीत पुरूषाचा मृतदेह

महाबळेश्वरच्या आर्थरसिट दरीत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: May 20, 2018, 01:32 PM IST

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या आर्थरसिट दरीत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दोन हजार फुटांपेक्षा खोल दरीत हा मृतदेह आढळला आहे. स्थानिक आणि ट्रेकर्सच्या मदतीने या मृतदेह बाहेक काढण्यात येत आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम मृतदेह बाहेर काढण्यासाठी दरीत उतरली आहे. याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. पण हा पुरूषाचा मृतदेह असण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.