नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस चांगला झाल्यानं धरण लवकर भरलंय. निसर्गाचा हा अद्भुत करिष्मा पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींचे थवे भंडारदरा धरणाकडे मार्गस्थ होत आहेत.

Updated: Jul 23, 2018, 12:47 PM IST
नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी title=

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालय. त्यामुळे डोंगर दऱ्यातून वाह्णारे छोटेछोटे धबधबे आणि निर्सगाचं सुंदर असं रुप पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केलीय. वीकएण्डला तर इथं जत्रेचे स्वरुप आलं होतं. 

मुसळधार पावसामुळे धरण लवकर भरले

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस चांगला झाल्यानं धरण लवकर भरलंय. निसर्गाचा हा अद्भुत करिष्मा पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींचे थवे भंडारदरा धरणाकडे मार्गस्थ होत आहेत.

सुरक्षेसाठी पोलिसांची तुकडी तैनात

दरम्यान, अतिउत्साही पर्यटकांना आवरण्यासाठी भंडारदरा परिसरात अशी पुन्हा पोलीसांची तुकडी नेमण्याची मागणी होवू लागली आहे.