सावधान तुम्ही बाप्पाला दाखवत असलेला नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?

मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. बाप्पाला मिठाईचा नैवेद्य देण्यासाठी मिठाईच्या दुकानात गर्दी होऊ लागलीये. मात्र तुम्ही दाखवत असलेला मिठाईचा नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?...

Updated: Sep 10, 2021, 12:58 PM IST
सावधान तुम्ही बाप्पाला दाखवत असलेला नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना? title=

मुंबई : मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. बाप्पाला मिठाईचा नैवेद्य देण्यासाठी मिठाईच्या दुकानात गर्दी होऊ लागलीये. मात्र तुम्ही दाखवत असलेला मिठाईचा नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?...

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मिठाईतल्या भेसळीचं प्रमाण वाढलंय. याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानंही धडक मोहीम सुरू केलीये. सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात मिठाईला मागणी वाढलीय. शिवाय घरातही मिठाई बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरूयं. मात्र तुम्ही घेत असलेली मिठाई किंवा मिठाईचे पदार्थ शुद्ध असतीलच असं नाही. कारण शुद्धतेच्या नावावर भेसळखोरीचं प्रमाण वाढलंय. वाढती मागणी लक्षात घेऊन ग्राहकांच्या हाती भेसळयुक्त पदार्थ देऊन त्यांची हातोहात फसवणूक केली जातेय.

एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या सांगण्यानुसार, "यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये मिठाई उत्पादकांची तपासणी करणं तसंच संशयित मिठाईच्या नमुन्यांची तपासणी अशा पद्धतीच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे."

मिठाईतली भेसळ कशी ओळखाल ?

भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी खवा थोडासा पाण्यात विरघळून घ्या. त्यात थोडं टिन्क्चर आयोडीन टाका. निळा रंग आल्यास त्यात भेसळ आहे असं समजा...मिठाईवरील चांदीचा वर्क बोटावर घेऊन चोळल्यास तो वितळला नाही तर त्यात भेसळ असून तो अॅल्युमिनियमचा असू शकतो.

मिठाईचे रंग जास्त गडद असल्यास ते रंग आरोग्यास हानिकारक असू शकतात. शुद्ध तुपात वनस्पती तुपाची भेसळ ओळखण्यासाठी त्याचा वास घ्यावा. शक्यतो पॅक बंद तूप खरेदी करा. भेसळयुक्त मिठाई तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे कुणी भेसळ करत असेल तर तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्या. सतर्क राहा आणि स्वत:ची काळजी घ्या.