मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्यानं चार युवकांना पोलिसांकडून मारहाण

मराठी स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून मारहाण

Updated: Mar 15, 2021, 01:14 PM IST
मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्यानं चार युवकांना पोलिसांकडून मारहाण title=

बेळगाव : बेळगावात पोलिसांनी (belgaum Police) चार युवकांना अमानूष मारहाण (Four Youths Beaten) केलाचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मराठी भाषेचे स्टेटस (Marathi launguage Status) ठेवण्याच्या कारणावरून पोलिसांनी ही मारहाण केलीय. मराठी भाषिक वाघ आहेत, असं स्टेट्स मध्ये या गावातील तरुणांनी ठेवलं होतं. याच कारणावरून पोलिसांनी मारहाण केलीय. या घटनेवर बेळगावसह महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होतोय.