बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळाले. मात्र, धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले बजरंग सोनवणे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. 

वनिता कांबळे | Updated: Jun 5, 2024, 04:55 PM IST
बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव title=

Beed Loksabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्काादा.क निकाल बीड मतदार संघात पहायला मिळाला. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाची चव चाखायला लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा धूळ चारली. तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीच्या हिंदोळ्यावर इथली लढत रंगली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे.   

बीड हा तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. गेली 15 वर्षं बीड भाजपचा गड आहे. यंदा भाजपने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिले.  बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडउघडपणे मराठा-ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. इथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आलीय तर राष्ट्रवादीकडून मराठा चेहरा देण्यात येतो. शेवटच्या क्षणी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळल्याची चर्चा आहे..

बीडचं राजकीय गणित 

2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आजही भाजपचा गड मानला जातो. 2009 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक जिंकली आणि बीडमध्ये भाजपचे कमळ फुललं. 2014मध्ये पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा 1 लाख 36 हजार मतांनी पराभव केला.   

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुंडेंची कन्या प्रीतम मुंडेंनी काँग्रेसच्या अशोकराव पाटलांचा विक्रमी 6 लाख 96 हजार मतांनी पराभव केला. 2019 ला पुन्हा प्रीतम मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा 1 लाख 68 हजार मतांनी पराभव करत विजयी झाल्या होत्या. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. बजरंग सोनवणेंचा 1 लाख 68 हजार मतांनी पराभव करत प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या
बजरंग सोनवणे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. 

पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांनी बीडमध्ये मोठा डाव टाकला. बजरंग सोनावणे शरद पवार यांच्या संपर्कात आले. अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणेही शरद पवार गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरुन  बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून  शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.