विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : दोन महिन्यांपासून शाळा कॉलेज सुरू झाले मात्र बीडमध्ये अद्याप विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची सोय झाली नाही. विद्यार्थी राहतात असलेल्या ठिकाणी कोरोना काळात कैद्यांना ठेवण्यात आलं. मात्र जेल प्रशासन आता कायद्यांना बाहेरच काढत नाहीय. याचा नाहक फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
बीडचे शासकीय विद्यार्थी वस्तीगृह हे अद्यापपर्यंत सुरू झालं नाहीय. त्यामुळे शासकीय वसतिगृह सुरू करावे अशी मागणी विद्यार्थीनींनी केली. यासाठी विद्यार्थी समाज कल्याण आयुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि आयुक्तांपुढे त्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं. मागील दोन महिन्यापासून शाळा कॉलेज सुरू झाले. मात्र शासकीय वसतिगृह सुरू झाले नाहीत. तरी आम्ही या विद्यार्थिनींना मोठा खर्च सहन करावा लागतोय
गोरगरीब वंचितांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनुसूचित जाती जमाती वस्तीग्रह शासनाकडुन सुरू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना काळामध्ये हे वसतिगृह जेलच्या कैद्यांना राहण्यासाठी दिलं. कोरोना संकटांमध्ये प्रशासनानं तातडीचा निर्णय म्हणून हे केलं. मात्र शाळा सुरू दोन महिने झाले तरी अद्याप हे वसतिगृह कायद्यांच्या नियमांमध्ये अडकून आहे असं दिसतंय. आयुक्तांनी सांगून देखील हे वसतीगृह जेल प्रशासनानं रिकामं केलं नाही याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसतोय.
कोरोनामुळे वर्षभरापासून बीड जिल्ह्यातील वस्तीग्रह वर्षभरापासून बंद होतं. इतर जिल्ह्यातील वसतिगृह सुरू झाले मात्र बीड जिल्ह्यातील वस्तीग्रह अध्यापन सुरू झाला नाही. सध्या हॉस्टेलमध्ये कैदी ठेवण्यात आले आहेत.
आम्ही वारंवार मागणी केली मात्र कैदी जात नाहीत. त्यामुळे आमच्या शिक्षणाची सोय होत नाही. आम्हाला बीडमध्ये रूम करून राहणं परवडणार नाही असे विद्यार्थी सांगतात. वसतीगृह सुरू होत नसल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये ऊसतोडीला जाण्यासाठी काही जणांनी आपल्या मुलींचे विवाह केले. आमची आता परीक्षा सुरू होणार आहे. आम्हाला पैसे पुरणार कोणी नाही. त्यामुळे लवकरात लवकर हॉस्टेल सुरू करण्याची मागणी केल्याचे प्रतीक्षा शीरसाट या विद्यार्थिनींनं सांगितलं.
कॉलेज सुरू झाल्यामुळे आम्ही आलो आहोत. होस्टेल सुरू नसल्यामुळे रूम करून राहावे लागत आहे. यासाठी खुप पैसे लागतात. दोन महिन्यांपासून आम्ही त्या ठिकाणी राहत होतो. मात्र आता हे परवडणार नाही. वस्तीगृह सुरू झालं तर आमची सोय होईल असं मत विद्यार्थिनी नीता लाडने व्यक्त केलं.
आम्ही जेल प्रशासनाला सांगितल आहे. मात्र तरीदेखील वसतिगृह खाली केलेलं नाही. आता मी जिल्हाधिकारी यांची भे घेणार आहे आणि लवकरात लवकर वसतीगृह सुरू करता येईल यासाठी तातडीने पावले उचलली जाणार असल्याचे समाज कल्याणचे आयुक्त मडावी यांनी सांगितले.