शिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात

ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.

Updated: Apr 4, 2023, 12:46 PM IST
शिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव  ठाकरे ठाण्यात title=

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray in Thane : ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जोरदार मारहाण झाली. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदे यांना मारहाण केली.  ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत संजय राऊत यांनी राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल केला आहे.

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

ठाण्यात सरकार पुरस्कृत हल्ला घडवून आणला आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच झालीय, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे राज्य आहे की नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

आम्हालाही हल्ला करता येतो. ठाण्याच्या पोलिसांनी हातात बांगड्या भरल्या आहेत का? एका महिलेवर हल्ला केला जात आहे. हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राज्यात कायदा आहे का की नाही? हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन होत आहे. तुम्ही पोलिसांना बाजुला ठेवा, मग बघा?, आम्हालाही हल्ला करता येतो. त्यावेळी समजेल हल्ला काय असतो तो, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.