कुत्रा पाळताय तर सावधान... अन्यथा होऊ शकते जेल

तुम्ही जर घरात कुत्रा पाळला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे.

Updated: Mar 16, 2021, 07:35 PM IST
कुत्रा पाळताय तर सावधान... अन्यथा होऊ शकते जेल title=

अमर काणे, नागपूर : तुम्ही जर घरात कुत्रा पाळला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचा कुत्रा जर कुणाला चावला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. नागपुरात अशाच एका प्रकरणात कुत्र्याच्या मालकिणीला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.

अनेकजण आवड म्हणून कुत्रा पाळतात. कौतुकानं त्याचे लाडही पुरवतात. पण तुमचा आवडता टॉमी तुम्हाला तुरूंगाची हवा खायला लावू शकतो. नागपुरातल्या एका महिलेला याचा चांगलाच अनुभव आला आहे. तिच्या पाळीव कुत्र्यानं एका मुलाला चावा घेतला. त्यामुळे नागपूरच्या कोर्टानं तिला सहा महिने कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

डॉ. संगीता बालकोटे असं या महिलेचं नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना आणखी सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. 29 जून 2014चं हे प्रकरण आहे. आपल्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण न ठेवता आल्यानं कोर्टानं या महिलेला कारावासाची शिक्षा सुनावलीय. 

श्वानप्रेमींनो वेळीच सावध व्हा. तुम्ही जर आवडीनं कुत्रा पाळत असाल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवा. तुमचा टॉमी कुणाला चावणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर तुम्हालाही जेलची वारी करावी लागेल.

बातमीचा व्हिडिओ