हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे: हल्ली बैलांच्या जवळ जाऊन त्यांच्यासोबत मस्ती करत खेळ करण्याचे प्रमाण सध्या वाढू लागलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच अशा प्रकारांना आळा घालणं बंधनकारक झालं आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (baigada sharyat pune) समोर आला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान एका शर्यतीच्या बैलाने बैल पकडणाऱ्या तरुणाला चक्क शिंगावर घेतलंय,शर्यतीची बारी झाल्या नंतर बैल पकडण्यासाठी बैलगाडा घाटासमोर बनवण्यात आलेल्या रिंगनात या बैलाने एका तरूणाला शिंगावरती घेऊन खाली आपटलंय त्यामुळे तरूनांनी बैलगाडा घाटात बैल पकडताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे या व्हिडीओ (video) मधून समोर येतं आहे. (bailgada pune news the racing bull throws young man on his knees and mauled him)
ग्रामीण महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर बैलगाडा शर्यत पुन्हा झाली. शर्यतीच्या बैलांना पुन्हा लाखोंचा भाव आला होता. शर्यतीसाठी दणकट असणाऱ्या बैलांच्या खरेदी-विक्रीचाही धुरळा उडू लागला होता. त्यात डुंबरवाडी गावच्या प्रमोद डुंबरेंच्या बजरंगी नावाच्या बैलानं तर कहरच केला होता. शर्यतीत पहिला आलेल्या बजरंगीनं खरेदीच्या बोलीतही पहिला नंबर पटकावला होता. बजरंगीला (bajrangi) चक्क फॉच्यूर्नरपेक्षाही (fortune) अधिक किंमत मिळाली होती. बजरंगी दिसायला डौलदार. पांढऱ्या रंगाचा चपळ बजरंगी शर्यती गाजवतो. म्हणूनच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या किशोर दांगट आणि बबन दांगट या शेतकरी भावंडांनी तब्बल 25 लाख रुपये त्याच्यासाठी मोजलेत.
दांगट बंधूंना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड. हौसेला मोल नसतं म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या पिंट्या बैलाला बंजरंगीची जोड दिली. शर्यती सरू झाल्यामुळे बैलांना सोन्याचा भाव (gold price) आला होता. बैलांच्या किमती पुढच्या काळात वाढत्याच राहणार असल्याचं बैलगाडा मालकांचं म्हणणं होतं. बैलगाडा शर्यतीमुळे भीर्रर्रचा नाद तर घुमू लागलाच पण बजरंगीसारख्या डौलदार बैलांना महागड्या गाड्यांएवढी किंमत मिळू लागली आहे.