Babasaheb Purandare | राज ठाकरे जेव्हा बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतात

इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे

Updated: Nov 15, 2021, 07:59 AM IST
Babasaheb Purandare | राज ठाकरे जेव्हा बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतात title=

पुणे : इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे लिखान केले होते. जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग त्यांनी सुरू केले. बाबासाहेबांच्या कार्यामुळे राज ठाकरे प्रेरित होते. एका समारंभात राज यांनी बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. राज यांच्या या कृतीचं खुप कौतुक झालं होतं.

बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती.

राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्प व पगडी देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरेंच्या या कृतीमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले सारेच भारावून गेले.

या आधी देखील देखील अनेक वेळा राज यांनी बाबासाहेबांची भेट घेतली होती. बाबासाहेबांच्या कार्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. आजच्या तरुणाईलाही बाबासाहेबांच्या कार्याविषयी अवगत करीत राहीले.