नाशिक : एखाद्या गोष्टीचे अमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकत असतो. लोकांना अनेकदा अशी अमिषे दाखवून गंडा घातला जातो.
माजी मंत्री आणि आमदार बबनराव घोलप यांच्यासोबतही असेच काहीसे घडलेय. बबनराव घोलप यांची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीये.
याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयफोन आणि व्हीआयपी नंबर देण्याच्या आमिषापोटी फसविल्याचा आरोप आहे.
सर्वसामान्यांसोबत आता आर्थिक घोटाळ्यात लोकप्रतिनिधींची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय.