कोविन अ‍ॅप हॅक; 16 नावांची एन्ट्री झाल्याचं उघड

औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Updated: Aug 30, 2021, 12:18 PM IST
 कोविन अ‍ॅप हॅक; 16 नावांची एन्ट्री झाल्याचं उघड title=

औरंगाबाद : देशात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र यामध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये कोविन अॅपवरील औरंगाबाद महापालिकेचं लॉग इन आयडी हॅक झालं आहे. 

याबाबत औरंगाबाद महापालिकेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. महापालिकेचं लॉग इन वापरून 16 नावांची एन्ट्री करण्यात आल्याची प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर लसीकरण प्रमाणपत्र सुद्धा काढण्यात आलंय. 

धक्कादायक बाब म्हणजे लस न घेताच ही प्रमाणपत्रं काढण्यात आली आहेत. ही 16 नावं 2 कुटुंबांतील व्यक्तींची असल्याचं प्राथमिक माहितीत कळतेय. पोलीस आणि महापालिका आता या हॅकर्सचा शोध घेत आहेत. महापालिकेचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड काही महत्वाच्या लोकांनाच माहिती असतं. त्यामुळे सध्या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय.