अशी वेळ येऊ शकते, रात्री रिक्षाचा प्रवास करताय तर सावधान!

रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान. ही बातमी तुमच्यासाठी आहे.  

Updated: Feb 28, 2020, 06:49 PM IST
अशी वेळ येऊ शकते, रात्री रिक्षाचा प्रवास करताय तर सावधान! title=

औरंगाबाद : रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान. ही बातमी तुमच्यासाठी आहे. औरंगाबादमध्ये रात्री घडलेला एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. सीसीटीव्हीत हा सगळा प्रसंग चित्रित झाला. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर काळजी घेतली पाहिजे.

औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार. रात्री रिक्षात बसताना थोडे सावधान. स्त्यावरुन चालणाऱ्या प्रवाशाच्या मागून एक रिक्षा येते. अख्खा रस्ता मोकळा असताना रिक्षावाला थेट त्या प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालतो. त्या प्रवाशाला अक्षरशः चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. 

औरंगाबादच्या विद्यानगर भागात राहणारे गिरीश गोळेगावकर, २७ तारखेला रात्री साडे बाराच्या सुमाराला सेव्हन हिल भागात रिक्षात बसले. त्या रिक्षात आधीच तीन जण होते. रिक्षा विद्यानगर जवळ आल्यावर गिरीश उतरले आणि घऱी जायला लागले, मात्र रिक्षा चालक मागून आला आणि त्यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. 

रिक्षातून एक जण उतरुन गिरीश यांच्या मागे धावला, त्यात गिरीश पडले, त्यांना मारहाण झाली. मात्र कसाबसा त्यांनी पळ काढला, लुटण्याच्या उद्देशानं या रिक्षाचालकांनी हा प्रकार केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

या धक्कादाक प्रकारानंतर रात्रीचा प्रवास सुरक्षित होणं हे पोलिसांचीही जबाबदारी आहे. त्यादृष्टीने या रिक्षाचालकावर कठोर कारवाई आणि त्याबरोबरच शहरात रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षाही गरजेची आहे, अशी मागणी होत आहे.