बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी, स्थानिकांमध्ये दहशत

बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी झाले

Updated: Jun 29, 2018, 09:31 AM IST
बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी, स्थानिकांमध्ये दहशत   title=

औरंगाबाद : धक्कादायक बातमी औरंगाबादमधून  धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात शिवराई परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी झालेत. शिवराईतल्या शिवारात या बिबट्याचा मुक्काम आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांचा या शिवारात राबता आहे. आज हा बिबट्या अचानक समोर आल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणं अवघङ झालंय. बिबट्यामुळे इथले शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत.  ग्रामस्थ आणि वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करतंय. पण या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.