मतमोजणी दरम्यान सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले

 घोषणाबाजी करत हे दोन्ही कार्यकर्त्याने एकमेकांना भिडले 

Updated: Jun 29, 2018, 09:12 AM IST
मतमोजणी दरम्यान सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले  title=

मुंबई : कोकण पदवीधर मतदार संघाची मतमोजणी  सुरु असताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर एकमेकांविरोधात  जोरदार घोषणा बाजी सुरु केली. यामध्ये भाजपने भाड्याची माणसे आणल्याचा घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपने मोदींचा नारा धरल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला.घोषणाबाजी करत हे दोन्ही कार्यकर्त्याने एकमेकांना भिडले मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दूर नेले. यामुळे येथे पोलीस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली.

कोकणात डावखरे 

विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे यांना ८१२७ मतांच्या आघाडीने विजयी झाली. ही निवडणुक भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेही प्रतिष्ठेची बनवली होती. विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुख यांचा पराभव केला.