शिर्डी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईभक्तांनी शिर्डीत एकच गर्दी केलीय. परंतु, या गर्दीत साई पालखीवड दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. साईंची पालखी औरंगाबादहून पायी घेऊन आलेल्या भक्तांवर शिर्डीच्या वेशीवरच हल्ला करण्यात आला. 'साईलीला परिवार पालखी' असं या मंडळाचं नाव आहे. अंधाराचा फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे नेमका हा हल्ला करणारे कोण? हे अद्याप समजू शकलेलं नाही.
चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याचं समोर येतंय. कारण, पालखीवर दगडफेक केल्यानंतर समाजकंटकांनी पालखीत सहभागी झालेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक माहिती थोड्याच वेळात...