'प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही'

'माझ्यावरचे गुन्हे हे माझ्यासाठी अलंकार आहेत'

Updated: Oct 9, 2019, 09:05 AM IST
'प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही' title=

सोलापूर : विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढणारे माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा विरोधकांवर टीका करताना तोल ढळलाय. 'प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही', असं म्हणत प्रचाराची घसरलेली पातळी त्यांनी दाखवून दिली.

सोलापूर मध्य मतदारसंघातून नरसय्या आडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एका प्रचार रॅलीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. इतकंच नाही तर 'मोदींना सोलापुरात आणू शकतो, तो काहीही करू शकतो' असंही वक्तव्य यावेळी आडम मास्तरांनी केलं.

'माझ्यावर १०० केसेस आहेत ते २०० होईपर्यंत शांत बसणार नाही... माझ्यावरचे गुन्हे हे माझ्यासाठी अलंकार आहेत' असंही आडम मास्तरांनी म्हटलं.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांमध्ये मेकअप बॉक्सचं वाटप केलं होतं. या विरोधात आडाम यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रारही दाखल केली. 

 या विरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली होती.