'भाजपनं देश-राज्याला देशोधडीला लावलं'

अहमदनगरमध्ये सुरू झालेलं जनआक्रोश आंदोलन म्हणजे उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय.

Updated: Oct 31, 2017, 07:06 PM IST
'भाजपनं देश-राज्याला देशोधडीला लावलं' title=

अहमदनगर : अहमदनगरमध्ये सुरू झालेलं जनआक्रोश आंदोलन म्हणजे उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय. तर भाजप सरकारनं देश आणि राज्याला देशोधडीला लावल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. राज्यातील सरकार हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

काँग्रेसनं आजपासून जन आक्रोश आंदोलनाला सुरूवात केलीय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसनं अहमदनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनाला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही उपस्थिती लावली. शिवाय 8 नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, तसंच देशाचं मोठं नुकासान झाल्याचा आरोप करता, 8 नोव्हेंबरला काँग्रेस काळा दिवस पाळणार आहे.