'गेल्या ३ वर्षांत राज्याचा बट्याबोळ झाला'- अशोक चव्हाण

राज्य सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

Updated: Oct 31, 2017, 02:55 PM IST
'गेल्या ३ वर्षांत राज्याचा बट्याबोळ झाला'- अशोक चव्हाण title=

औरंगाबाद : राज्य सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

गेल्या ३ वर्षात भाजप शिवसेना सरकार काहीही करू शकले नाही. फक्त घोषणाबाजीचे सरकार म्हणून या सरकारनं काम केलंय असा टोला, अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत लगावला.

फडणवीस सरकारनं केंद्राच्या योजना कॉपी करून राज्यात आणून इथला बट्ट्याबोळ केल्याचा आरोपीही चव्हाणांनी केला.

राज्यात शेतक-यांचा आत्महत्यांचा कळस झाला आहे. तरी सरकार फक्त हातावर तुरी देत आहेत. खड्डे बुजवणार असं राज्य सरकार सांगतंय, मात्र प्रत्यक्षात फक्त तारीख पे तारीख असला प्रकार सुरु असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला.