पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?

15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.  आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली. 

वनिता कांबळे | Updated: Aug 8, 2023, 06:02 PM IST
पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला? title=

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्याराजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार  यांच्या राष्ट्रवादी पक्षापाठोपाठ आता आणखी एक राजकीय पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana)  फूट पडण्याची चिन्हं आहेत. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाले आहेत. यामुळे रविकांत तुपकर वेगळा गट स्थापन्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.

बैठकीला रविकांत तुपकर यांची दांडी

पुण्यात (Pune) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक पार पडली. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे रविकांत तुपकर यांची भूमिका जाणून घेण्यासाठीच आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रविकांत तुपकर हे या बैठकीला गैरहजर होते. 

वादात सदाभाऊ खोत यांची उडी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वादात आता सदाभाऊ खोत यांनी उडी घेतलीय. स्वाभिमानी संघटनेची शिस्तपालन समिती तुपकर यांचं काहीही करू शकणार नाही. राजू शेट्टी यांना अनेक सहकारी सोडून गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. स्वाभिमानी आता शिल्लकच राहिली नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे. 

बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर रविकांत तुपकर यांची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची चिन्हं आहेत. 15 ऑगस्टच्या बैठकीलाही  तुपकर आले नाहीत, तर पाच लोकांची समिती त्यांच्यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलीय. तुपकरांचा रोख आपल्यावर असल्यानं आपण या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असं शेट्टींनी स्पष्ट केलंय. दरम्यान आजच्या शिस्तपालन समितीच्या पुण्यातल्या बैठकीला रविकांत तुपकर गेले नाहीत. संघटनेच्या हितासाठी नाराजी असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिलीय. 

आपल्याला संपवण्याचं काम केलं जातंय; रविकांत तुपकर यांचा आरोप 

स्वाभिमानी शेतकरी संघटनाही फुटीच्या मार्गावर चाललीय की काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घडामोडी घडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले मतभेद चव्हाट्यावर आणले होते. या बैठकीत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. सदाभाऊ खोत आणि आपण संघटना वाढवली, आपली कोणावर नाराजी नाही, मात्र आपल्याला संपवण्याचं काम केलं जातंय असा आरोप तुपकरांनी केला होता.