Maharashtra Politics : दोन वर्षात दोन मोठे राजकीय भूकंप राज्यानं पाहिलेत. आधी एकनाथ शिंदेंचं बंड आणि नंतर अजित पवारांचं अचानक सरकारमध्ये सामील होणं.. या दोन भूकंपांमुळे उडालेला धुरळा खाली बसतो ना बसतो तोच राज्यात पुन्हा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मंत्री शंभूराज देसाईंनी केलेल्या दाव्यामुळे अजून कोणते आमदार सरकारच्या वाटेवर आहेत या चर्चांना उधाण आल आहे.
शरद पवार गटाचे आमदार सरकारच्या वाटेवर असल्याच्या देसाईंच्या दाव्यावर विरोधक तुटून पडले आहेत. ठाकरे गटाचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटले. अजित पवारांसोबत 40 हून सरकारमध्ये सामील झाले. आता शरद पवार गटातील मोठा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. शरद पवार गटातील एकच नेता येणार की अनेक आमदार येणार याबाबत गुप्तता
काँग्रेसचा एक गट नाराज असल्याची चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीला अजून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ आणि समित्यांचं वाटप बाकी आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरु झाल्यात. त्यामुळे अजून कोणते आमदार महायुती सरकारच्या वाटेवर आहेत याचं कवित्व रंगलं आहे.
अजित पवार म्हणजे भाजपसाठी युज अँड थ्रो आहेत.. तेव्हा अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाहीत... असं स्फोटक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. तसंच अजित पवार महायुतीमध्ये कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत अशी भविष्यवाणीही त्यांनी केलीय...
उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही. भाजपला टोले हाणायची एकही संधी ठाकरे सोडत नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. मविआ सरकारमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, असा दावा करण्यात आलाय. शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ठाकरे भाजपसोबत जाणार होते, याबद्दल सर्वात आधी तटकरेंनी विधान केलं, त्यानंतर केसरकरांनी ठाकरे-भाजप बोलणी झाली होती, या आशयाचं विधान केलंय. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंबद्दल केलेल्या या टायमिंगची चर्चा होतेय. आता येत्या 24 ऑक्टोबरला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.