आंगणेवाडी भराडी देवी यात्रा २४ फेब्रुवारीला, 'अशी' असेल नियमावली

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. कोविड १९ नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Updated: Feb 18, 2022, 11:38 AM IST
आंगणेवाडी भराडी देवी यात्रा २४ फेब्रुवारीला, 'अशी' असेल नियमावली title=

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा कोविड नियमांचे पालन करून होणार आहे. यासंदर्भात नियोजन झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

आंगणेवाडी देवस्थानचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी, यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. भाविकांना अगदी सुलभतेने दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल. सर्व भाविकांना दर्शन घेता येईल. आंगणे कुटुंबीयांकडून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

गेल्या वर्षी मर्यादित स्वरूपात उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. कोरोनाचे नियम पाळून आयोजन करण्यात येईल. बैठकीत व्यवस्थापन आणि नियोजनासंदर्भात जे काही निर्णय झाले आहेत, त्यावर आम्ही समाधानी आहोत,असे त्यांनी सांगितले.

या यात्रेच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंगणे कुटुंबीयांसोबत कुडाळ येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

'अशी' आहे नियमावली

- कोकणातील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारीला

- कोविड नियमांचे पालन करून यात्रा होणार

- दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश

- कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच ही यात्रा होणार आहे.

- व्यापाऱ्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

- स्टॉलची संख्या कमी करण्याचा निर्णय