अमरावतीमधील कोल्हे हत्याकांडाचं पाकिस्तान कनेक्शन?

अमरावती हत्याकांडाचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा NIAला संशय 

Updated: Jul 19, 2022, 05:24 PM IST
अमरावतीमधील कोल्हे हत्याकांडाचं पाकिस्तान कनेक्शन? title=

 अमरावती : अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय एनआयएला आहे. 

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडात मोठा खुलासा करण्यात आला आहे. आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहिती नुसार उमेश कोल्हे हत्याकांडातील 3 आरोपीना परदेशातून फोन आल्याचं समोर आलं.

अमरावती हत्याकांडातील आरोपी इरफान शेख,अब्दुल तौफीक, आणि आतिब राशिद यांना इंटरनेशनल कॉल आले होते.  एनआईए च्या सूत्रानुसार हे कॉल 25 मे रोजी आरोपींना जर्मनी, यूके आणि पाकिस्तानमधून आले होते.

आरोपींनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र सीडीआरनुसार हे सिद्ध होत असल्याचा एनआयएने दावा केला आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयपूर आणि अमरावती हत्याकांडाचं पाकिस्तान कनेक्शन असू शकतं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आरोपीला चौकशीसाठी राजस्थानला नेल्याची माहिती मिळाली आहे.