अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये (Amravati Daryapur) मैत्रिला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आपल्या मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या एका मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड (Video Recording) करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन दोन जणआंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी मित्राला दारू पाजली
27 वर्षीय वासनांध तरूणाने 19 वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली. तिथं उपस्थित तिसऱ्या मित्राने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. इतक्यावरच हे आरोपी थांबले नाहीत, त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल (Social Media Viral) देखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : Shocking CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack
अत्याचाराचा हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आला. बघता बघता हा शेकडो लोकांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड झाला. त्यामुळे त्या तरुणांची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.