राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Updated: Jan 7, 2023, 11:55 PM IST
राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल! title=
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari: मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवमानावरुन महाराष्ट्रातील राजकीय (Maharastra Politics) वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी शेअर केला आहे. (amol mitkari big claim about governor bhagat singh koshyari over statement about Chhatrapati shivaji maharaj marathi news)

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय. त्यामुळे आता कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाब विचारला आहे.

काय म्हणाले मिटकरी?

राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला, असं मिटकरी म्हणाले आहेत. राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय.

आणखी वाचा - Chitra wagh: उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या!

काय म्हणाले राज्यपाल ?

सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहिये, चंद्रशेखर होने चाहिये, भगतसिंह होने चाहिये, नेताजी होने चाहिये, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहिये, असं राज्यपाल कोश्यारी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खाली जाताना दिसतोय. त्यामुळे सर्वपक्षांनी सबुरीने वक्तव्य करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून केली जात आहे.