विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणुका लढत होतो, आता तेच लोक दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे आता स्वबळावर निवडणुका लावल्याशिवाय पर्याय नाही असा नारा बीड काँग्रेस चे प्रभारी आमदार अमित देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या आमदारांना मोठा फटका बसणार आहे. हे मात्र निश्चित.
अमित देशमुख यांनी रविवारी काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आपण स्वबळावर सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी ठेवणार आहोत. बीडची जागा ही काँग्रेसच लढणार असून त्यासाठी सक्षम उमेदवारही असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी म्हंटले आहे. बीडमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीवेळी कार्यकर्त्यांना उद्देशून देशमुख बोलत होते. देशमुख यांच्या या दाव्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संभ्रम असून यापूर्वी बीडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. बीड हा धनंजय मुंडे यांचा मतदार संघ आहे. आता या जागेवर देशमुख यांनी दावा केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.
सत्तांतर महाराष्ट्राची राजकीय सांस्कृती आणि परंपरा राहिलेली आहे. तीला एक छेद झालाय असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. महाराष्ट्रानं स्वतंत्र काळात अग्रेसरपणे काम केले. देशाला दिशा देण्याचं काम केलं. आणि आज त्या राज्यात सत्तेसाठी जे सुरू आहे ते पाहून दुःख होतेय. विचार आणि कार्यक्रम हे बाजूला राहिले. वाटाघाटी पुढे आल्या. अशात सत्तांतर झाले तर महाराष्ट्रातील एकंदरीत प्रतिमेला शोभणारे नाही असेही अमित देशमुख म्हणाले.
पैसे घेऊन बेईमानी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक काँग्रेस पक्षाचा असल्याच धक्कादायक वक्तव्य माजी मंत्री वसंत पुरके यांनी केल आहे. काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यावर काँग्रेस च्या अनेक नेत्यांचा पक्षात जीव गुदमरायला होत असल्याचा आरोप त्यांनी केला. धुळे येथे काँग्रेस भवनात धुळे लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक घेत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सत्ता गेले की नेत्यांना पक्षात करमत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची नाव त्यांनी यावेळी घेत, कोणालाही आपण सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. साडेचार वर्षे सत्तेत राहायचं आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर काँग्रेसमध्ये जीव गुदमारायला होत असल्याचे काँग्रेस नेते सांगतात आणि पक्षांतर करत असल्याचा आरोप पुरके यांनी केला आहे.