अंबरनाथजवळ तरूणीवर बलात्कार तर तरूणाला गोळ्या झाडणारा आरोपी जेरबंद

अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या, तसेच तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 12, 2018, 01:22 AM IST
अंबरनाथजवळ तरूणीवर बलात्कार तर तरूणाला गोळ्या झाडणारा आरोपी जेरबंद title=

ठाणे : अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या, तसेच तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. संजय नरवडे या ३० वर्षाच्या आरोपीला अटक कऱण्यात आली आहे. आपण पैशाच्या हव्यासाने चोरी केली, तसेच तरुणीविषयी आकर्षण वाटल्यामुळे हा बलात्कार केला, अशी कबुली संबंधित आरोपीने दिली आहे.

संजय नरवडे उल्हासनगरला राहतो, तसेच रिक्षाचालक म्हणून काम करतो. ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँचने उल्हासनगरमध्ये सापळा रचून संजयला अटक केली. 

प्रेमी युगुल या सुनाट रस्त्यावर भेटतात

रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि भयाण शांतता. अंबरनाथहून नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. शहराच्या दगदगीपासून शांतता मिळवण्यासाठी प्रेमी युगुल या ठिकाणी येतात.

तरूणीवर बलात्कार आणि तरूणावर २ गोळ्या झाडल्या

गणेश दिनकर हा कल्याणला राहणाऱ्या तरुणीसोबत रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या आडोशाला बसला होता. मात्र तिथे अचानक आलेल्या २ जण आले, त्यांनी गाडीची चावी आणि पैसे मागितली. त्याला गणेशने नकार देताच त्याच्या छातीत ३ गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश दिनकर हा मूळचा शहापूरचा आहे, तो अंबरनाथला चायनीजच्या दुकानात काम करत होता.तरुणीवर बलात्कार करुन त्याची गाडी घेऊन आरोपी निघून गेले.