खडसे-महाजन गटामधला वाद पुन्हा उफाळला

उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे दोन बडे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील बेबनाव आता जनतेसाठी नवीन नाही.

Updated: Oct 8, 2017, 08:41 PM IST
खडसे-महाजन गटामधला वाद पुन्हा उफाळला  title=

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे दोन बडे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील बेबनाव आता जनतेसाठी नवीन नाही. या वादाचे पडसाद मात्र संघटन पातळीवर उमटू लागलेत.

जळगाव जिल्हा भाजपमध्ये आजी माजी मंत्र्यांमध्ये असलेली गटबाजी आता संघटन पातळीवरदेखील उफाळून आलीय. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जाहीर केलेल्या अमळनेरमधील पक्ष कार्यकर्त्यांची कार्यकारिणी बगलबच्यांना दिली असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी केला. या कार्यकारिणीबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत दानवे यांनी कार्यकारिणी रद्द केली.