पुण्यातला रंगला काश्मीरी तरूणांसोबत मैत्रीचा सामना

पुणे दौ-यावर असलेल्या या तरुणांसाठी, उरी पुणे मैत्री सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Updated: Oct 8, 2017, 08:36 PM IST
पुण्यातला रंगला काश्मीरी तरूणांसोबत मैत्रीचा सामना title=

पुणे : सतत दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली असलेल्या जम्मू काश्मीरमधल्या उरी इथल्या तरुणांसाठी रविवारचा दिवस विशेष ठरला. 

पुणे दौ-यावर असलेल्या या तरुणांसाठी, उरी पुणे मैत्री सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या माध्यमातून काश्मिरमधल्या तरुणांचा देशातल्या तरुणांशी सुसंवाद घडवून आणणं हा यामागचा हेतू होता. 

पुण्यातल्या असीम फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित या सामन्यासाठी, गेला आठवडाभर उरीची टीम सराव करत होती. 

यासाठी  पुण्यातल्या विविध क्रिकेट क्लबकडून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं. बीएमसीसी कॉलेजच्या ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात पुण्याच्या संघाचा विजय झाला. 

मात्र या मैत्री सामन्यातून खूप काही शिकायला मिळाल्याचं उरीतल्या तरुणांनी सांगितलं.