'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

Woman Police Suicide Akola: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकटेपणामुळं नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवले आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 16, 2023, 06:21 PM IST
'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल title=
akola news Depressed woman cop commits suicide

जयेश जगड, झी मीडिया

Woman Police Suicide Akola: अकोल्यातील एका महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या (Woman Police Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ३५) असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाइड नोटदेखील लिहून ठेवली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Akola Crime News Today)

शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात वृषाली स्वर्गे या कार्यरत होत्या. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी त्या शासकीय कार्यक्रमाला गेल्या नव्हत्या. त्या घरीच होत्या त्यामुळं स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच त्यांनी गळफास घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी वृषाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. 

15 ऑगस्टलाच संपवले जीवन

१५ ऑगस्टला पूर्णदिवस त्या घरातून बाहेर पडल्या नव्हता. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दार तोडत घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. तसंच, घरात एक सुसाइड नोटही लिहलेली पोलिसांना सापडली आहे. 

सुसाइड नोट सापडली

वृषाली स्वर्गे यांनी चिठ्ठीत आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. 'आधी पतीचे निधन झाले, त्यात मूलं-बाळ नाही. आयुष्यात एकटीच राहिली, या आयुष्याला पूर्णपणे वैतागले आहे, म्हणून आज मी आपलं जीवन इथेच संपवत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहून वृषाली यांनी आत्महत्या केली आहे. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे कारण व मृत्यू कधी झाला आहे याबाबत खुलासा होणार आहे.