अकोल्यातील कंपनीच्या गोदामाला भीषण आग

Updated: Apr 26, 2018, 06:15 PM IST

अकोला : अकोल्यातील कुंभारीजवळील एमआयडीसीमधील स्टार एग्रो कंपनीच्या गोदामाला साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा सोयाबीन, कापूस आणि तूर जळून खाक झाली. गोडाऊनच्या शेजारी असलेल्या शेतात आग लागल्यामुळे ती पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.