अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी

 गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाची एकहाती सत्ता

Updated: Jan 7, 2020, 07:33 AM IST
अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी title=

अकोला : भाजपला मात देऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतही  अकोला जिल्हा परिषदेच्या 53 आणि 7 पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पण इथल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नाहीय. तर भाजप आणि शिवसेना इथे स्वबळावर लढत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.इथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी स्पर्धा नसून भारिप आणि इतर पक्ष यांच्यात हा सामना आहे.कारण गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाची एकहाती सत्ता आहे.

इथल्या 7 पंचायत समितीसाठी एकूण 492 जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी एकूण 270 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानसाठी एकूण 1017 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

एकूण 8 लाख 48 हजार 702 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ही निवडणूक भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. 

विशेष म्हणजे अनेक बोलणीनंतर सुद्धा जिल्ह्यातिल मूर्तिजापूर विधासभा क्षेत्र वगळता महाविकास आघाडी स्थापन झाली नसून भाजप, शिवसेना आणि भारिप बहुजन महासंघ स्वबळावरही निवडणूक लढत आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.