अकोला : अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याने पहाटे स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गळा ब्लेडने चिरून स्वतःला गंभीर जखमी केलं होतं.
अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून ७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (११ एप्रिल) पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले.
रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला आहे. मयत रुग्ण हा ३० वर्षांचा असून तो मूळचा सालपडा जि. नागाव, आसाम येथील रहिवासी आहे.
६ ते ८ मार्चच्या दरम्यान तो दिल्ली येथील ताब्लिकी जमातच्या कार्यक्रमात सहभागी असल्याचं पोलिसांनी म्हंटलंय. तर तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी त्याला ७ एप्रिल रोजी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.
काल १० एप्रिल रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कोरोना बाधित रुग्णाच्या आत्महत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. आसामच्या सालपाडा येथील ३० वर्षीय कोरोना पोझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली.
हा रुग्ण ७ एप्रिलला उपचारासाठी दाखल झाला होता. अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णवार उपचार सुरू होता. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णची प्रकृती देखील स्थिर होती.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात या रुग्णवर उपचार सुरू होता. रुग्णाने स्वतःचा गळा ब्लेडने चिरून आत्महत्या केली. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल दोन दिवसाधी आला होता आणि त्याप्रमाणे त्यावर उपचार ही सुरू होते.
कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. मात्र जर आत्महत्या केली असेल तर मानसिक तणावातून किंवा नैराश्याने तर नाही ना अशी चर्चा सध्या सुरू आहे.