मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या कारणाबाबत रहस्य कायम आहे. दरम्यान, राज्य सहकार बॅंक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. यापूर्वी पाटबंधारे घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव आल्याने त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. मात्र, आता त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने ते बंडाच्या तयारीत आहेत का? दरम्यान, ते संकटांच्या या घटनाक्रमात काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजितदादांनी आपला राजीनामा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवला आहे. अजित पवारांचा राजीनामादेखील स्वीकारण्यात आला आहे. मात्र, राजीनामा देण्याचे कारण अजितदादांनी जाहीर केले नाही. परंतु राजकीय अनेक अंदाज बांधले जात आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असताना अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत अजितदादांना काका शरद पवार यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा फडकावयाचा आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित कऱण्यात येत आहे. तसेच बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला आहे काय?, अशीही चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप आहे. अजित पवार यांच्यासहीत ७० जणांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात ईडीने शरद पवार यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. शिवाय गुन्हाही दाखल केला आहे. तथापि, शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, मी कधीही संचालक किंवा बँकेतले कोणतेही पद माझ्याकडे नव्हते. मात्र, अजित पवारांच्याबाबतीत बोलायचे झाल्यास ते बँकेत संचालकपदावर होते. अशा परिस्थितीत अजित पवारांनी यामुळे राजीनामा दिला असावा, असा तर्क लढविण्यात येत आहे. यापूर्वी पाटबंधारे घोटाळ्यात अजितदादांच्या नावामुळे त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबातील वारसा दरम्यानची लढाई देखील जुनी आहे. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार यांच्यात वारसा लढाई काही नवीन नाही. पण सध्या राजकीय पंडितांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अजित पवार हे संकटांच्या गर्तेत आहेत. या घटनेत काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकावतील याचीच चर्चा आहे.