सुरज चव्हाणचा डायलॉग आणि खळखळून हसले अजित पवार! आयुष्यातली 'ती' इच्छा पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

Suraj Chavan Meets Suraj Chavan: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला.

Pravin Dabholkar | Updated: Oct 12, 2024, 05:36 PM IST
सुरज चव्हाणचा डायलॉग आणि खळखळून हसले अजित पवार! आयुष्यातली 'ती' इच्छा पूर्ण करण्याचे दिले आश्वासन title=
सुरज चव्हाण

Suraj Chavan Meets Suraj Chavan: सध्या सोशल मीडियात सुरच चव्हाण या तरुणाची सर्वात जास्त चर्चा आहे. 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलाय. गरीब परिस्थितीतून आलेल्या सुरज चव्हाणला सर्व स्तरातून खूप प्रेम मिळालं. यामुळे तो बिग बॉस स्पर्धेची ट्रॉफी जिंकू शकला. सुरज चव्हाण हा बारामती मतदारसंघात राहतो. लग्न करण्याची आणि घर बांधण्याची इच्छा त्याने बिग बॉसच्या घरात बोलून दाखवली होती. यातील एक इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्ण करणार आहेत. नुकतीच सुरज चव्हाणने अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी त्याला आश्वासन दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी त्याच्या कुटुंबाची विचारणा केली. तसेच सुरज चव्हाण याला घर बांधून देण्याचे आश्वासनदेखील दिले. यावेळी सुरज चव्हाण याने अजित पवार यांना डायलॉग बोलून दाखवला. यानंतर अजित पावराचे खळखळून हसूले.

काय म्हणाले अजित पवार?

सूरज हा आमच्या बारामती मधील मोढवे गावाचा रहिवासी आहे. सुरुवातीला रिल्स काढत असताना सुरजला बिग बॉसमध्ये संधी मिळाली. सूरजचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकण हे लोकांना भावल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच सुरजला 2 बीएचके घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं पुढचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मी रितेश देशमुखशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.