Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.  

Updated: Dec 30, 2022, 03:21 PM IST
Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण? title=

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) सभागृहात उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलावी लागली. (Maharashtra Political News) त्यामुळे अजित पवार नाराज झाले. मंत्री इथे नाही आले तर त्यांना जाब कोण विचारणार? गिरीश महाजन का आले नाही, असा सवाल त्यांनी केला.(Maharashtra Assembly Winter Session) पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातं माहिती नाही, सर्वांचे लाड चाललेत, असे अजित पवार म्हणाले. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव विरोधकांकडून सादर करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, अजित पवार यांनी याविषयी आपल्याला काही माहितीच नसल्याचे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, विधिमंडळाच्या बाहेर या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेत अजित पवार संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरु असताना अजित पवार संतप्त

आज विधानसभा अधिवेशनात सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरु असताना अजित पवार संतप्त झालेत. चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर पुढे आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या पाच क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा होणे अपेक्षित होते. या लक्षवेधीवर मंत्री गिरीश महाजन उत्तर देण्याची अपेक्षा होती. मात्र, तेच या अधिवेशान उपस्थित नव्हते. गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यावरुन अजित पवार चांगलेच संतप्त झाले. हे काय चाललं, असं म्हणत अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमदार वैभव नाईक यांची लक्षवेधी पुढे ढकलली

वैभव नाईक यांची लक्षवेधी पुढे का ढकलली? वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलत राहणार? आम्हीही मंत्री होतो. आम्ही काय इथे एकदम येऊन बसलेलो नाही. मंत्र्याचं काम आहे इथे यायचं. जर मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार, असा सवाल अजितदादा यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

 एक वेळ आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे समजू शकतो. त्यांना जास्तीची कामे असतात. अशावेळी दुसरे लोक उत्तरे देतात. आम्ही मान्य केले आहे. पण गिरीश महाजन का सभागृहात नाही. सरळ पुढच्या अधिवेशनात घेऊ, असे कसं सांगता. पुढच्या अधिवेशनात कोण राहतेय, कोण जातेय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्हीही कुणी यावर काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड सुरु आहेत, असे अजितदादा म्हणाले.