भारतातील पाच गावांची अजब कहाणी, Cobra सह एकत्र राहण्याऱ्या महाराष्ट्रातील 'या' गावाबाबत; जाणून घ्या

प्रत्येकाची आपल्या मूळ गावाशी नाळ जुळलेली असते. प्रत्येक गावाची स्वत:ची अशी वेगळी ओळख असते.

Updated: Sep 8, 2022, 01:13 PM IST
भारतातील पाच गावांची अजब कहाणी, Cobra सह एकत्र राहण्याऱ्या महाराष्ट्रातील 'या' गावाबाबत; जाणून घ्या title=

Ajab Gajab Village In India And Their Identity: गाव म्हणजे संस्कृती आणि समाजाचं एकत्रित रुप असतं. प्रत्येकाची आपल्या मूळ गावाशी नाळ जुळलेली असते. प्रत्येक गावाची स्वत:ची अशी वेगळी ओळख असते. काही गावं पिकांसाठी, तर काही साक्षरतेसाठी किंवा स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असतात. पण काही गावं वेगळ्याच कारणांसाठी (Ajab Gajab Village) आपलं लक्ष वेधून घेतात. आज आम्ही भारतातील अशाच काही गावांबाबत सांगणार आहोत. या गावांची ओळख वेगळ्याच कारणांमुळे होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतफळ गावाची (Solapur Shetphal Village)  ख्याती सर्वदूर पसरली आहे. या गावात साप आणि माणसं एकत्र असं सांगितलं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. या गावात विषारी साप कोब्रा आणि माणसं एकत्र (Cobra And People Live Together) राहतात. 

पुण्यापासून सुमारे 200 किमी दूर सोलापूर जिल्ह्यात शेतफळ हे गाव आहे आहे. या गावातील प्रत्येक घरात विषारी कोब्राचा कायम निवास असतो. गावकरी या सापांची पूजा करतात आणि त्यांना कुटुंबाप्रमाणे वागवतात. आश्चर्याची बाब म्हणजे या सापांमुळे गावकऱ्यांना कोणताही त्रास होत नाही. या सापांना घरात कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य असून गावात मुक्तपणे फिरण्याची मुभा आहे. हे विचित्र गाव पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात.

कोडाइकनाल हिल स्टेशनजवळ वेलागावी हे गाव वसलं आहे. या गावात सुमारे 200-300 इतकीच लोकसंख्या आहे. पण या गावात मंदिरांची संख्या घरांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या गावात कुणालाही चप्पल किंवा बूट घालण्याची परवानगी नाही. जर कोणी बूट घातलेच तर तर त्याला शिक्षा होते. तसेच या गावात जाण्यासाठी कोणताही रस्ता नसून वेळगावी पोहोचण्यासाठी कुंभकराईपासून घनदाट जंगलातून ट्रेकिंग करत जावं लागतं. या पायी प्रवासासाठी सुमारे आठ तास लागतात.

लोंगवा हे नागालँडमधील मोन जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावातून भारत-म्यानमार सीमा येथून जाते. गावप्रमुखाचे घर कापल्याने त्याचे दोन भाग झाले आहेत. घराचा एक भाग भारतात, तर दुसरा भाग म्यानमारमध्ये येतो. ब्रिटिश कार्टोग्राफरने सीमारेषा बांधली होती. दोन्ही बाजूचे गावकरी कोन्याक जमातीचे आहेत. 1970-71 मध्ये काढलेली, आंतरराष्ट्रीय सीमा गावाच्या प्रमुखाच्या घराला विभाजित करते. विशेष म्हणजे राजाचे कुटुंब म्यानमारमध्ये जेवते आणि भारतात झोपते.

बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील अधौरा उपविभागात असलेले बरवां काला गाव हे बॅचलर्सचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात वीज, पाणी, आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे अनेक दशकांपासून विवाह सोहळा पार पडला नाही. असं असताना2017 मध्ये 50 वर्षांनंतर गावात मिरवणूक सोहळा झाला. नववधूचे एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे स्वागत करण्यात आले.

भारतात संस्कृत ही प्राचीन भाषा असली तरी बोलली जात नाही. पण कर्नाटकातील शिवमोग्गा जवळ शिमोगा जिल्ह्यात 'मत्तूर' नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातील स्थानिक लोक फक्त संस्कृत बोलतात, जरी राज्याची अधिकृत आणि मूळ भाषा कन्नड आहे.