महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?

त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं.... 

Updated: Nov 12, 2019, 02:32 PM IST
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : विधानसभा निवडणूक होऊन अनेक दिवसांचा काळ उलटला असतानाही महाराष्ट्राती सत्तास्थापनेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. निवडणुकीच्या निकालामुसार पहिला मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या क्रमांकावर असणारी शिवसेना आणि तिसऱ्या स्थानावर असणारा राष्ट्रवादी पक्ष सध्या सत्तास्थापनेच्या या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसच्या भूमिकेलाही तितकंच महत्त्व दिलं जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होणाऱ्या या सर्व घडामोडी आणि मिनिटामिनीटाला बदलणारी परिस्थिती यावर एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 

सत्तेचा तिढा सुटत नसतानाच, कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरत आहे. पण, आपण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं मत ओवैसी यांनी मांडलं आहे. आम्ही भाजपला किंवा शिवसेनेला पाठिंबा देत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आता काँग्रेस- राष्ट्रवादी जर शिवसेनेला पाठिंबा देत असतील तर, कोणत्या पक्षाची मतं कोणाच्या वाट्याला गेली, कोणाची कोणाला साथ आहे हे चित्रही स्पष्ट होईल असं उपरोधिक वक्तव्य त्यांनी केलं. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षालाही राज्यपालांनी सत्तास्थपनेसाठीचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं होतं. ज्या आधारे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवेसी यांना त्यांची प्रतिक्रिया विचारलं असता त्यांनी अनोख्या शैलीत या परिस्थितीवर भाष्य केलं.

'पहले निकाह होगा, उसके बाद सोचेंगे की बेटा होगा या बेटी. अभी तो निराह ही नही हुआ.....', असं म्हणत ये सब खेल हो रहा है, या शब्दांमध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेमध्ये असणारी अनिश्चितता ओवैसी यांनी अधोरेखित केली.