अहमदनगर: आपल्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संभाजी भिडेंनी नगरमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताला सर्वात मोठा धोका हा चीन, पाकिस्तान आणि सुशिक्षित भारतीय समाजापासून असल्याचं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून रायगडावर ३२ मण सुवर्ण सिहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याचा प्रसार करण्यासाठी संभाजी भिंडे यांनी राज्यभर दौरा सुरु केलाय.
या दौऱ्यादरम्यान वादग्रस्त विधानाची मालिका त्यांनी सुरूच ठेवलीय. भिडे यांची सभा सुरु असताना नगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. भीमा कोरेगाव दंगलीत ज्यांच्यावर आरोप झाले त्या संभाजी भिडे यांची नगरमध्ये सभा होऊ नये यासठी विविध दलित संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. भिडे यांची सभा सुरु असताना रीपाइंच्या कार्याक्रत्यानी सभागृहाबाहेर गोंधळ घालून निदर्शने केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली.
भिडे यांची सभा सुरु असताना नगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस संरक्षणात भिडे यांची ही सभा शांततेत पार पडली.